कालव्यांची भजी - पाककृती

कालव्यांची भजी, पाककला - [Kalvyanchi Bhaji, Recipe] सोप्पी आणि झटपट होणारी कोंकणी मांसाहारी पाककृती ‘कालव्यांची भजी’ स्टार्टरसाठी एक चांगला पर्याय आहे.
कालव्यांची भजी - पाककला | Kalvyanchi Bhaji - Recipe

सोप्पी आणि झटपट होणारी मांसाहारी पाककृती कालव्यांची भजी

‘कालव्यांची भजी’साठी लागणारा जिन्नस

 • १ पेला कालवं
 • पाव किलो बेसन
 • १ चमचा धणेपूड
 • पाव चमचा हळद
 • २ चमचा तिखट
 • २ चमचा कोकम आगळ (कोकम पाणी)
 • चिमूटभर हिंग
 • तेल
 • चवीनुसार मीठ

‘कालव्यांची भजी’ची पाककृती

 • कालवं नीट स्वच्छ करून धुवून घ्यावीत.
 • एका बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यामध्ये धणेपूड, हळद, तिखट, कोकम आगळ, हिंग आणि चवीनुसार मीठ टाकावे.
 • सर्व जिन्नस एकत्र करावेत आणि त्यामध्ये धुतलेली कालवं टाकावीत.
 • कालवं वरील पीठात मिक्स करावेत आणि पीठात थोडे थोडे पाणी घालून भजीच्या पीठासारखे मिश्रण करावे.
 • पॅनमध्ये १ मोठा चमचा तेल घालून त्यामध्ये १ - २ कालवं हातात घेऊन तेलात सोडा. जेवढी पूरतील तेवढी सोडा.
 • कालवं दोन्ही बाजुने खरपूस भाजून घ्या. तयार आहेत कालव्यांची भजी. गरमागरम कालव्यांची भजी सर्व्ह करा.
टीप: कालवं कुरकुरीत करण्यासाठी पीठामध्ये १ चमचा कॉर्नफ्लॉवर घालू शकता.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.