स्टार प्रवाहवरील मोलकरीण बाई या मराठी मालिकेच्या टीमने सेटवर केले दणक्यात सेलिब्रेशन
स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते १०० भागांच्या पुर्ततेचं. या खास मोक्यावर केक कटिंग करत कलाकारांनी आनंद व्यक्त केला. रिअल लोकेशनवर या मालिकेचं शूटिंग पार पडतं. त्यामुळे खऱ्याखुऱ्या वस्तीत हे सेलिब्रेशन पार पडलं.या मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारिला निलाटकर यांनी याप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘मालिकेचे शंभर भाग कधी पूर्ण झाले कळलंच नाही. या मालिकेच्या निमित्ताने आमचं छान कुटुंब तयार झालंय. प्रत्येकालाच एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी माहिती आहेत. पडद्यामागची हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. या मालिकेने यशाचा असाच टप्पा पार करत रहावा अशी भावना सारिका निलाटकर यांनी व्यक्त केली.’
![]() |
मोलकरीण बाईचे १०० भाग पूर्ण |
‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या आजवरच्या प्रवासात प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. यापुढील प्रवासही तितकाच रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहे. सध्या मालिकेत अनिताची बहिण रंजना अनिताच्या संसारात विष कालवण्याचा प्रयत्न करतेय. अनिता यावर कशी मात करणार? याची कहाणी मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी न चुकता पाहा ‘मोलकरीण बाई’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.