भोवऱ्यात सापडली ही माझी नाव, देवा आता तुच मदतीला धाव
भोवऱ्यात सापडली ही माझी नावदेवा आता तुच मदतीला धाव
वादळ वारे सुसाट धावती
गीळण्यासाठी ही माझी नाव
दुरुनी पाहू नकोरे देवा
होऊनी आता तु साव
भोवऱ्यात सापडली ही माझी नाव
देवा आता तुच मदतीला धाव
वीजा कडाडती धोधो पाणी
पाण्यात अडकली ही माझी नाव
मदतीचा हात आता तुच देना
जपत आहे मी तुझे नाव
भोवऱ्यात सापडली ही माझी नाव
देवा आता तुच मदतीला धाव
संकटांनी वेढली ही माझी नाव
नियतीचा आहे का हा डाव
तारुणी नेशील तु मला रे
मनी आहे हाच भावं
भोवऱ्यात सापडली ही माझी नाव
देवा आता तुच मदतीला धाव