कोलीम आठळ्याची भाजी - पाककृती

कोलीम आठळ्याची भाजी, पाककला - [Kolim Aathalyachi Bhaji, Recipe] कोकणातील प्रसिद्ध आणि पारंपारिक पद्धतीची मांसाहारी भाजी.
कोलीम आठळ्याची भाजी - पाककला | Kolim Aathalyachi Bhaji - Recipe

कोकणातील प्रसिद्ध आणि पारंपारिक पद्धतीची मांसाहारी भाजी

‘कोलीम आठळ्याची भाजी’साठी लागणारा जिन्नस

 • पाव किलो सोलून तुकडे केलेल्या फणसाच्या बिया (आठळ्या)
 • १ वाटी कोलीम
 • २ छोटे बारीक चिरलेले कांदे
 • २ छोटे बारीक चिरलेले टोमॅटो
 • २ मोठे चमचे मालवणी मसाला
 • पाव चमचा हळद
 • ४ - ५ ठेचलेला लसूण
 • चिमूटभर हिंग
 • १ चमचा गरम मसाला
 • २ मोठे चमचे तेल
 • दिड चमचे कांदा - खोबर्‍याचे वाटण
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • चवीनुसार मीठ

‘कोलीम आठळ्याची भाजी’ची पाककृती

 • सर्वप्रथम फणसाच्या बिया (आठळ्या) स्वच्छ धुवून १ दिवस उन्हात वाळवून घ्याव्यात.
 • सुकलेल्या या बिया ठेचून वरील पांढरे साल काढून त्या बियांचे आवल-चावल तुकडे करून घ्यावेत.
 • कोलीम स्वच्छ धुवून घेऊन त्यातले पाणी काढून टाकावे.
 • एका भांड्यात तेल तापवून त्यामध्ये ठेचलेला लसूण परतून घ्यावा. लसूण परतल्यावर त्यामध्ये कांदा व टोमॅटो टाकून मऊ होईपर्यंत परतून घ्या.
 • कांदा व टोमॅटो मऊ शिजल्यावर त्यामध्ये धुतलेला कोलीम टाकून परतून घ्या.
 • खमंग वास सुटल्यावर त्यामध्ये बियांचे तुकडे टाकून परतून घ्या.
 • आता यामध्ये हिंग, हळद, मालवणी मसाला व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून झाल्यावर १ ग्लास पाणी घाला.
 • पाणी घातल्यावर भांड्यावर झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊयात.
 • उकळी आल्यावर त्यामध्ये कांदा - खोबर्‍याचे वाटण टाकून परता व बिया मऊ होइपर्यंत शिजवा.
 • बिया शिजल्या की त्यामध्ये गरम मसाला पावडर टाकून एक उकळी काढा व कोथिंबीर पेरून गॅस बंद करा.
 • तयार आहे आपली कोलीम आठल्याची भाजी.
गरमा गरम भाकरीसोबत कोलीम घालून फणसाच्या बियांची भाजी अतिशय रुचकर लागते.

(जर तुम्हाला कोलीम आवडत नसेल तर कोलीम न घालता फक्त फणसाच्या बियांची शुध्द शाकाहारी भाजीही करू शकता)


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.