आस - मराठी कविता

आस, मराठी कविता - [Aas, Marathi Kavita] आस लावूनी जीवाला मी वाट पाहत आहे.

आस लावूनी जीवाला मी वाट पाहत आहे

आस लावूनी जीवाला मी वाट पाहत आहे
समजावूनी या मनाला हा घोट घेत आहे

झाले असे कितीदा माझे हजार हरणे
जपुनी उरात जखमांना श्वास घेत आहे

आपुले म्हणालो ज्यांना तेच फितुर झाले
त्यांच्याच काळजांचे मी वेध घेत आहे

परतुनी आता पुन्हा मी खंबीर केले जगणे
माझे बुलंदी तारे माझ्या नभात आहे
संजय शिवरकर | Sanjay Shivarkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.