भुक - मराठी कविता

भुक, मराठी कविता - [Bhukh, Marathi Kavita] भुक सोसना पोटात, माय दारोदारी फिरे.

भुक सोसना पोटात, माय दारोदारी फिरे

भुक सोसना पोटात
माय दारोदारी फिरे
कसे मावळले तिच्या
खुळा नशिबाचे तारे

निष्ठूर माणसाचे घरी
नाही मिळेना भाकर
झाले भुकेने व्याकुळ
सोन्यासारखे लेकर

माय कावरी-बावरी
धुंडाखला गाव सारा
भिक देईना कुणी
नाही लाभला सहारा

कसं आलयां भोगणं
जगणं झालंया लाचार
कसा माती मोल झाला
तीचा सुखाचा संसार
संजय शिवरकर | Sanjay Shivarkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.