कैरीचे रायते - पाककृती

कैरीचे रायते, पाककृती - [Kairiche Raayate, Recipe] उन्हाळ्यासाठी चटपटीत आणि आंबट-गोड कोकणी पद्धतीचे असे खास कैरीचे रायते.

आंबट-गोड कोकणी पद्धतीचे असे खास कैरीचे रायते

‘कैरीचे रायते’साठी लागणारा जिन्नस

 • १ मध्यम आकाराची कैरी
 • अर्धा वाटी किसलेला गूळ
 • अर्धा चमचा तिखट
 • किंचीतसे मीठ

‘कैरीचे रायते’ची पाककृती

 • सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्या
 • कुकरमध्ये ४ - ५ शिट्ट्या काढून कैरी उकडून घ्या
 • उकडलेली कैरी थोडी थंड होऊ द्या. थंड झाल्यावर सुरीच्या सहाय्याने उकडलेल्या कैरीचा गर काढून घ्या
 • उकडलेल्या गरासोबत उकडलेल्या सालीचे थोडेसे लहान - लहान तुकडेसुद्धा घ्या. त्यामुळे रायते चवीला छान लागते
 • सर्व गर काढून झाल्यावर गरामध्ये वरील सर्व जिन्नस घालून एकत्र करा व रवीच्या किंवा पावभाजीच्या दट्ट्याच्या सहाय्याने सर्व जिन्नस गरामध्ये एकजीव करून घ्या
 • गरामध्ये गूळ व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे
 • अश्यातर्‍हेने तयार आहे ‘कैरीचे रायते’
हे कैरीचे रायते तुम्ही गरमागरम पोळी किंवा पराठ्यासोबतही खाऊ शकता.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.