तुझी आठवण येते गं आई - मराठी कविता

तुझी आठवण येते गं आई, मराठी कविता - [Tujhi Aathavan Yete Ga Aai, Marathi Kavita] देवाच्या त्या घरी, आज अवचीत काय घडले.
तुझी आठवण येते गं आई - मराठी कविता | Tujhi Aathavan Yete Ga Aai - Marathi Kavita
तुझी आठवण येते गं आई
मन शोधतं असते तुजला, तु येना गं आई...

देवाच्या त्या घरी
आज अवचीत काय घडले
का तुजला देवाने
मज पासनू दुर नेहले
फोटोशी बोलतो मी
परी उत्तर मिळत नाही
स्वप्नांमध्ये आई
तु का गं येत नाही ?

तुझी आठवण येते गं आई
मन शोधतं असते तुजला, तु येना गं आई...

हिरमुसुन जातो बाबा
परी लाड पुरवती माझा
तझ्या आठवणींचा हुांदका
का येतो गं आम्हाला
किती विसरावे मी तुला
परी, आठवतेस तु मला
स्वप्नामध्ये आई
तु दर्शन दे गं मला...

तुझी आठवण येते आई गं
मन शोधतं असते तुजला, तु येना गं आई...

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.