प्रेमाचं रोपटं - मराठी कविता

प्रेमाचं रोपटं, मराठी कविता - [Premacha Ropata, Marathi Kavita] ती रोज मला भेटायची, पाहताच मला थांबायची.
प्रेमाचं रोपटं - मराठी कविता
ती रोज मला भेटायची
पाहताच मला थांबायची
गोड गोड हसून
मान घाली घालून जायची

का ती हसत होती
आज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं

त्याच त्याच घटनांचा
ऊत आला होता
अचानक नजर भिडण्याचा
मोहर आला होता

का ती मुध्दाम भेटायची
आज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं

तिचा माझा तसा
काही परिचय नव्हता
पण हसण्यावर तिच्या
माझा जीव आला होता

नकळत प्रेमात रमलो
तेव्हा मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.