अस्तित्व - मराठी कविता

अस्तित्व, मराठी कविता - [Astitva, Marathi Kavita] अस्तित्व माझे टिकवूनी, मीच उभा आहे.
अस्तित्व - मराठी कविता | Astitva - Marathi Kavita
अस्तित्व माझे टिकवूनी
मीच उभा आहे
पापणी आड अडवून सुनामी
उदरात ज्वालामुखी पेटला आहे

डोळ्यात बुडालेले
सुर्यबिंब क्षितीजावरचे
का चंद्र माझा
रोजचा उपाशीच आहे
अस्तित्व माझे टिकवुनी
मीच उभा आहे

सागराच्या काठावरी
गलबत माझे तुटले आहे
चंद्र मोळीचे छप्पर
आता पोरके झाले आहे
अस्तित्व माझे टिकवूनी
मीच उभा आहे

माझ्यासाठी नव्हतो
मीच स्वतःहा कधीही
ओठा जवळी आलेले
विष पचविले आहे
अस्तित्व माझे टिकवूनी
मीच उभा आहे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.