संस्कृतीचा महापुरुष - मराठी कविता

संस्कृतीचा महापुरुष,मराठी कविता - [Sanskruticha Mahapurush,Marathi Kavita]अमावस्येच्या कभिन्न रात्री संस्कृतीचा महापुरुष,काळाराम मंदिराच्या पायथ्याशी.
संस्कृतीचा महापुरुष - मराठी कविता | Sanskruticha Mahapurush - Marathi Kavita

एका अमावस्येच्या कभिन्न रात्री संस्कृतीचा महापुरुष, काळाराम मंदिराच्या पायथ्याशी भेटला

एका अमावस्येच्या कभिन्न रात्री संस्कृतीचा महापुरुष
काळाराम मंदिराच्या पायथ्याशी भेटला
हवापाण्याच्या गप्पा निघताच थोडासा संतप्त झाला
‘तुम्ही रांडीचे धर्मबुडवे आणि संस्कृतीभंजक’
आजोबा, चुकताहात तुम्ही!
काय म्हणतोस? त्याने डोळे उगाचच वटारले
‘अपेयपान आणि अभक्ष्यभक्षण शोभतं का तुला?
कोणाचं रक्तप्राशन करण्यापेक्षा... माझं उत्तर!
समर्थन करणारी जीभ हासडायला हवी.
...आणि भक्षणाचं म्हणातर लोकांचे लचके तोडण्यापेक्षा
हरामखोर बोलु नकोस... धर्मबाटम्या!
‘आजोबा, खाणं-पिणं दोन्हीही सोडलं
आणि मी स्वच्छ ब्राम्हण बनलो’
चेहरा आज्याचा हसतच फुलला
वाऽ डोकं ठिकाणावर आलं वाटतं
खरं आजोबा, मी खातही आणि पितही होतो
रजनीश वाचुन ‘रजनिशी’ झालो अन्‌ सारं सुटलं
तो हैवान - त्या संस्कृतीभंजकाच्या नादी तु?
हो आजोबा त्यांनीच मला ताळ्यावर आणलं
थरथरत ते पुढे निघाले ‘चकारही शब्द बोलु नको माझ्याशी
साऱ्या संस्कृतीची तु निंदा केलीस... का - का - का सांग?
मी धीरगंभीर प्रसन्न मुद्रेन वदलो
पुर्वजांची भूतं भोवताली फेर धरुन नाचतात
त्यांच्याच पापाची पारणी फेडून तीच सांगतात
आज्यानं तोंड लपवून घेतलं
परंपरा आपली विसरलास बेट्या! छान!
मंत्र, तंत्र, पुजा-अर्चा ध्यान, संध्या! सारं ते कवडीत बसेना दिसतंय!
‘तसं नाही आजोबा - असं पाहा इकडे
पुर्वजांना माझ्या गॅरंटी पक्की
अभाळी बाप बशेल नाही कुणी
म्हणुन तो यजमाना सांगती झणी’
‘काह?’ तो महापुरुष उगाचच करवदला
ठाऊक तुम्हाला, पुण्याची संकल्पना आहे ती गुप्त
केळी, मुसंबी, चिकु, संत्री ही फळ मात्र दृष्य
म्हणुन ते भटजी सांगतो यजमाना
पुण्य ते तुमचं फळ ती आमची
मी वळलो. तो महापुरुष जीव घेऊन पळत सुटला!


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.