शब्दांनो या - मराठी कविता

शब्दांनो या, मराठी कविता - [Shabdanno Ya, Marathi Kavita] अनुभुतीच्या शब्दांनो बिचकता का?, शपत माझी! मागं मागं फिरु नका, शब्दांनो या माझ्यामागून दौडत.
शब्दांनो या - मराठी कविता | Shabdanno Ya - Marathi Kavita

अनुभुतीच्या शब्दांनो बिचकता का?, शपत माझी! मागं मागं फिरु नका, शब्दांनो या माझ्यामागून दौडत या

अनुभुतीच्या शब्दांनो बिचकता का?
शपत माझी! मागं मागं फिरु नका
शब्दांनो या माझ्यामागून दौडत या
डॉक्टरांची शपथ तुम्हाला
मागं मुळीच पाहु नका
फुल्यांसारखे भंजक व्हा
डॉक्टरांसारखे वाहक व्हा
माझ्यासारखे कडक व्हा
आणि जमलंच तर, ढसाळ व्हायलाही दचकु नका!
कारण मानव्याचं चांदणं अजुन तरी बरसत नाही
म्हणुन म्हणतो उगाच घोळ घालु नका
संस्काराची नाळ तोडुन टाका
आवेगाने तुम्ही उठत चला
विद्रोहाने तुम्ही पेटत चला
करुणेनं अश्रु ढाळीत चला
आणि जमलंच तर चक्रधर व्हायलाही कचकु नका
कारण ‘मानव्याचं चांदणं’ अजुन तरी बरसत नाही


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.