मी एक बी. डी. - मराठी कविता

मी एक बी. डी., मराठी कविता - [Me Ek B. D., Marathi Kavita] दलितात एक डी. बी. असतो, त्याचा तरी एक चेहरा दिसतो, भटातही एखादा बी. डी. असतो.
मी एक बी. डी. - मराठी कविता | Me Ek B. D. - Marathi Kavita

दलितात एक डी. बी. असतो, त्याचा तरी एक चेहरा दिसतो, भटातही एखादा बी. डी. असतो

दलितात एक डी. बी. असतो
त्याचा तरी एक चेहरा दिसतो
भटातही एखादा बी. डी. असतो
तो मात्र कोणीच नसतो
रानडे आगरकर आणि माटे सावरकर
हे तर आमचे बी. डी. पूर्वज
त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसलो
अन्‌ साले! आम्ही मात्र उगाचच फसलो
कम्युनिस्ट आणि संघिष्ट
सोशॅलिस्ट आणि शोषित
साऱ्यांच्या घरात मुद्दाम शिरलो - हृदयस्थ झालो
तरीही अखेर! आम्ही मात्र बी. डी. ठरलो
डी. बी. ना तरी असते कोणी
मायेची शाल पांघरणारे आणि अश्रू ढाळून गोंजारणारे
आम्ही तर फुटक्या दैवाची काजळी डोळ्यात घालून वागवणारे
हाडऽ तू अन्‌ छीऽ थु चा दिर्घ अपमान पेलवणारे
अखेर आमचा आगरकरच ठरतो
कारण आम्ही मात्र कोणीच नसतो
देण्याघेण्याचे हिशोबाल तर आम्हीच सदा खातो मार
डी. बी. चं ऑडीट करायला चेंदवणकर होतो बास
बी. डी. चं ऑडिट त्यापूर्वीच करतात कित्येक लाख
अखेरचा आमचा ‘सावरकरच’ ठरतो
कारण आम्ही मात्र कोणीच नसतो


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.