डी. बी. दादा / बी. डी. ताई - मराठी कविता

डी. बी. दादा / बी. डी. ताई, मराठी कविता - [D. B. Dada B. D. Taai, Marathi Kavita] एक होता डी. बी., एक होता बी. डी., डी. बी. चं घर होतं शेणाचं.
डी. बी. दादा / बी. डी. ताई - मराठी कविता | D. B. Dada B. D. Taai - Marathi Kavita

एक होता डी. बी., एक होता बी. डी., डी. बी. चं घर होतं शेणाचं, बी. डी. चं घर होतं मेणाचं

एक होता डी. बी.
एक होता बी. डी.
डी. बी. चं घर होतं शेणाचं
बी. डी. चं घर होतं मेणाचं
एकदा काय झालं, मोठ्ठा पाऊस पडला
अन्‌ डी. बी. चं घर गेलं वाहून
मग धावत डी. बी. दादा, बी. डी. च्या दाराशी आला
‘बी. डी. ताई, बी. डी. ताई दार उघड’
‘थांब, बाळभाळी माझ्या ‘रानडे’ लेख लिहिते’,
‘बी. डी. ताई, बी. डी. ताई दार उघड’
‘थांब, माझ्या बाळाला ‘आगरकरी डोस’ देते’,
‘बी. डी. ताई, बी. डी. ताई दार उघड’
‘थांब, माझ्या दादा ‘पतीतपावन’चे मंदीर करते’,
‘बी. डी. ताई, बी. डी. ताई दार उघड’
‘थांब, माझ्या बाळाला तुझे ‘अंतरंग’ दावते’,
पाऊस थांबला अन्‌ बाहेर लख्खकन ऊन पडलं
तरीही बी. डी. दार ठोठावितच राहीला
बी. डी. ताईनं दार उघडलं - ‘प्रकाशी चांदणं’ निखळत होतं
‘बी. डी. ताई मला तुझ्या घरात घेशील का गं?
वेडा का दादा तू - बाहेर समतेचा ‘लोक’ फुललाय
आता मीच बाहेर येते कशी!


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.