मुर्दाड मृतात्म्यांना आवाहन, करणाऱ्या समस्त मलमली बडव्यांनो
मुर्दाड मृतात्म्यांना आवाहनकरणाऱ्या समस्त मलमली बडव्यांनो
जिवंत आत्म्याची वाणी तुम्ही ऐकलीय काय?
चंदेरी पुण्याच्या गाठीसाठी गंगेची ओंजळ
तर्पण करणाऱ्या भांगखाऊ भगीरथांनो
आमचे आकाशभर अश्रू तरी तुम्हाला पुरतील काय?
आकाशातील सुष्ट दुष्ट ग्रहगोलांना
नितंबू स्तुतीने वश करणाऱ्या भाटांनो
काळोखात डुंबलेला ‘मानव्याचा सूर्य’ तुम्हाला दिसेल काय?
कुठल्या शिंच्यानं निर्मिलेल्या स्वर्गी झरणाऱ्या क्षीरनद्यांची
लाळघोटी स्वप्ने पाहणाऱ्या भ्रमिकांनो
या शामल धरणीचा तुम्ही कलकत्ती नर्कच केलात ना?
संतानीही तुमच्या विटाळावर टाळाची मात्रा सांगून
अखेर त्यांनाही आपल्याच चरणी झुकवलं ना
ज्यानं त्यानं पायरीनं राव्ह हेच तुम्ही दावलंत ना!
यालाच म्हणतात निखळ सत्य!
कारण ‘सत्यापरता नाही धर्म
सत्य हेच परब्रह्म’