राणी, एवढं सांगून जा - मराठी कविता

राणी, एवढं सांगून जा, मराठी कविता - [Rani Evadh Sangun Ja, Marathi Kavita] राणी, एवढं सांगून जा, मुडद्याच्या रांगेतला माझा मुडदा कोणता?.
राणी, एवढं सांगून जा - मराठी कविता | Rani Evadh Sangun Ja - Marathi Kavita

राणी, एवढं सांगून जा, मुडद्याच्या रांगेतला माझा मुडदा कोणता?, ‘मजनू’ असतो तर ओळखलेच असते मला

राणी, एवढं सांगून जा
मुडद्याच्या रांगेतला माझा मुडदा कोणता?
‘मजनू’ असतो तर ओळखलेच असते मला
राणी, तू किती क्रुर, निष्ठुर आणि दुष्ट
‘लैला’ झालीस? मला ‘मजनू’ न करताच?
अश्रुसंपात कितीही ओसंडू दे - उसळू दे
मी मात्र ओळखतो तू ‘लैला’ नाही खास
ए वेडे, सांग ना - असं का केलंस?
बोहल्यावर चढतानाच माझा ‘मजनू’ का केलास
मी मृताटलो - पूर्णावलो - मुडद्याला कसली ओळख
मरण्यापूर्वीच ‘मजनू’ झालो असतो तर
आठवण तरी ताजी असती
पण मुडद्यावर कसला मजनू थोपतेस
तू लैला झालीस - होतीस - मजनूला न सांगताच!
हे मुडद्याला कसे कळणार
काहीही म्हण मीच खरा ‘आरस्यानी दुर्दैवी केंद्र’
मजनूचं कलेवर व्हायलाही भाग्य लागतं
म्हणून म्हणतो तू लैला नाही खास?


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.