हिंदी पिक्चर बघूनी की हे डोके कसे उठले, हाणामारी अन् तीच रडारड मेले दीन बापुडे
हिंदी पिक्चर बघूनी की हे डोके कसे उठलेहाणामारी अन् तीच रडारड मेले दीन बापुडे
नाट्याचा हा कैफ कोणता चढला त्या बच्चने
जाड्या, टकल्या वा हो पोलीस कोणासही तो आपटे
प्रेमरंगीच्या त्या गमजा बघता व्हिलन का हो उपटे
ठोकीता आरोळी ‘बचावे’ का तो नायक प्रकटे
पडता खलनायकी ‘मुडदा’ असंख्याते वाजती टाळ्या
विचारे मुडद्याला मिळती तितुक्याच की हो गाळ्या
बंधु दोघे बिछडती ती असतात मुळी जुळे
राहता वा येती समीत ते माता घाली साकडे
‘बेटे तेरा भाई ये मिलले तू उसके गले’
टाकुनी शस्त्र अवघे ते उमा काढीतो गळे
जीवनाच्या या दशा बघुनी की हो माझा कवि पेटला
रडता येईना उगा म्हणूनी की हे काव्यची तो प्रसवला