मी कवी नसतो तर बरे झाले असते, प्रेमाची महती मला कळलीच नसती
मी कवी नसतो तर बरे झाले असतेप्रेमाची महती मला कळलीच नसती
प्रेमाच्या गडावर
उत्कंठेची शिडी चढतांना
यशस्वीतेचा ध्वजच न्याहाळत होतो
पण मला ठाऊक नव्हते की
गडालाच सुरुंग लागतोय
गड तर मी केव्हाच जिंकला होता
पण तो माझा निखळ भ्रम होता
गडाच्या पायथ्याशी
ध्वजाच्या छायेत
फितुरांची दृष्टी ध्वजावर खिळली
ठरले होते ध्वजाचे - माझे
मी येताक्षणी व्हावे त्याने लाजून लाल
पण - पण रक्त देताच तो झाला लाली लाल
मी मात्र पडलो काळाशार
काळाचा वकुब ओळखून ध्वजानं
मिठी मारली अगदीच लहान
चिंता धडधडत होती माझी
ती मात्र पेटली छान
यालाच म्हणतात प्रेमगान?