Loading ...
/* Dont copy */

माझी कवीता - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मुकुंद शिंत्रे (मुकुंद मोरेश्वर शिंत्रे) यांची माझी कवीता ही लोकप्रिय मराठी कविता.

माझी कवीता - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

कवितेनं किती काळ रहायचं, चंद्राच्या, वेलीच्या आणि फुलांच्या संगतीता... माझी कवीता

माझी कवीता

मुकुंद शिंत्रे (कवितासंग्रह:एक बामण ढसाळलेला । नाशिक, महाराष्ट्र)

कवितेनं किती काळ रहायचं चंद्राच्या, वेलीच्या आणि फुलांच्या संगतीत किती वेळा थबकायचं तिनं आळसावलेल्या प्रियेच्या खळीत तोच विठोबा, तोच ज्ञानेश आणि तीच भक्ती तीच हुरहुर तेच लाघव आणि तीच मुक्ती म्हणा, ‘रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, किती काळ कंठायचा काव्यानं चातुर्वर्ण्याच्या चौकटीत आमचे पुर्वज अस्से शुर! हेच ओतायचं त्याच त्या मुशीत इतिहासाचं पानन्‌पान रक्ताच्या थेंबागत झालंय लाल तरीही साली! दचकत नाही खचकत नाही संस्कृतीची ही बेढव साल म्हणोत बापडे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ कविता नको लवलवणारी, ठुमकणारी आणि नटमोगरी खुदकन हसणे, रुसुन बसणे अन्‌ उभीच काया थरथरणारी खुश्शाल गा ‘सख्या चला बागामंदी रंग खेळू चला’ कविता असावी उसळणारी, आक्रंदणारी आणि संतापणारी उरस्फोट करीत धावणाऱ्या कामगारांची आणि खिंकाळणाऱ्या सावकारांची कविता नसावी श्लोकाची, शोकाची अथवा खोट्या क्रांतीची आणि नसावी भाकरीलाही उपमा लावणाऱ्या चंद्राची कविता असावी पवारांची, बागुलाची आणि ढसाळांची खरं खरं सांगा ‘स्वांतत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे’ काय म्हणता? आम्ही... आम्ही देशद्रोही? छान! कापा आमची मान अन्‌ कंठरवाने गा! ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!’

मुकुंद शिंत्रे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची