एक मस्त मजा - मराठी कविता

एक मस्त मजा, मराठी कविता - [Ek Mast Maja, Marathi Kavita] एक इंग्रज वळु, अधिक, एक भारतीय गोमात.
एक मस्त मजा - मराठी कविता | Ek Mast Maja - Marathi Kavita

एक इंग्रज वळु, अधिक, एक भारतीय गोमाता

एक इंग्रज वळु
अधिक
एक भारतीय गोमाता
बरोबर काय? संकरीत मस्त दुभती गाय!
चाखुन पितो - दुजांना देतो - पैसेही घेतो
भाळाला गंध लाऊन तिच्या गोमातेचं स्थानही देतो.
अवघ्या देवांची नाळ ठोकुन आम्ही तिच्या चरणी झुकतो
वाऽ रे वाऽ! गोरक्षणाचं कार्य छान चाललंय!
एक समतायुक्त ब्राम्हण युवक
अधिक
एक सुविद्य हरीजन युवांगी
बरोबर काय? हायब्रिड बेणं!
ते मात्र धुत्कारुन घुसमटवुन फेकत जाल
जन्माची नाळ तुटावी म्हणुन जादा धार्मिक होत जातं
‘बा’ ची चुक पुन्हा नको ती ‘म्हुन साल’ बामन होतं
वाऽ रे वाऽ! समाजवादी बेणं छान रुजलंय!


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.