भीमस्तवन - मराठी कविता

भीमस्तवन, मराठी कविता - [Bhimstavan, Marathi Kavita] भीमस्तवन मी काय करावे सांगावे मज भावे, हर्षुनी बोले जगन्नाथ मजसी तुझे तु पहावे.
भीमस्तवन - मराठी कविता | Bhimstavan - Marathi Kavita

भीमस्तवन मी काय करावे सांगावे मज भावे, हर्षुनी बोले जगन्नाथ मजसी तुझे तु पहावे

भीमस्तवन मी काय करावे सांगावे मज भावे
हर्षुनी बोले जगन्नाथ मजसी तुझे तु पहावे
पाड न लागे जये अनंता-सांदिपनी गुण गाता
मर्कटवेड्या खुळ्या मुकुंदा जाई कसा तु आता
बोटे मोडुनी दामोदरासी गेलो ब्रम्हाकडे
तवजन्म देऊनी चुक म्या केली ब्रम्हकंठ रोखे
लोटांगित मी शिवशंभोते घालोनी कैलासी
फिजुल प्रश्नीचे उत्तर कसले बोले निलकंठी
हिमालयाला बघुनी बोललो सांगे हिमराजा
पर्वत खोदुनी मुषक न काढी वेड्या भीमबाळा
मनी वरमलो परई न खिन्नलो पूसले वाऱ्यासी
मला धरुनी तु परी सोड त्या मुर्ख प्रश्न कसरती
पदी चालुनी अती मी थकलो आलो अवनीवरी
भीममुखाचे तेज विलसता प्रश्न न राहे उरी.


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.