समस्त उच्चभ्रुवाल्यांनो - मराठी कविता

समस्त उच्चभ्रुवाल्यांनो, मराठी कविता - [Samasta Ucchabhruvalyanno, Marathi Kavita] थूऽ तुमच्या भांच्योद नितंबू छिनालछाप जिनगानीचा, अधिकार नाही तुम्हा.
समस्त उच्चभ्रुवाल्यांनो - मराठी कविता | Samasta Ucchabhruvalyanno - Marathi Kavita

थूऽ तुमच्या भांच्योद नितंबू छिनालछाप जिनगानीचा, अधिकार नाही तुम्हाला चटोर चमचमीत खाण्याचा

थूऽ तुमच्या भांच्योद नितंबू छिनालछाप जिनगानीचा
अधिकार नाही तुम्हाला चटोर चमचमीत खाण्याचा
तीन-तीन घड्यांच्या वळकुटी गळ्यात अन्न न्‌ मांस लोटण्याचा
मक्ता घेतला का त्यांनी कोरभर कुटक्यासाठी वणवण दूर
भटकण्याचा
नाही अधिकार स्लिव्हलेसी पुष्टोन्मत दंड दाखवून ओठाचा चंबू
करण्याचा
डोंगराएवढे भुंडे लचकवून झुलवून-थुलवून चालण्याचा
नाजूक-साजूक तुपात घोळून अखंड लेक्चर झोडण्याचा
‘दया वाटते’ एवढंच म्हणून गांडू नक्राश्रु ढाळण्याचा
गाड्या - इमलयात फिरुन-झुरुन सुखांतिक बुके खरडण्याचा
मिशीचा बालाचा पिळ-विग ठेऊन धारुन स्मार्ट म्हणून दिसण्याचा
बुके सारी पढून-पढवून षंढ बुकोन्मत होण्याचा
थुऽ तुमच्या षंढचोट हृदयात कावळा शिवला मीहाऽऽ
किती दिवस जगणार असलं फालतू खोटं खिन्न जीणं
लाखोंना असते उभ्या देशात दोन वेळच्या भाकरीची भ्रांत
म्हणून अधिकार नाही तुम्हाला खळखळून खोकून हसण्याचा
समाजवादाची न्यारी गती ठेवलीए त्यांनी केलीए त्यांनी
सदान्‌कदा झिंगून-भंगून ठेचकाळणारी
मुंबई दिल्लीला झुलणारे खिळणारे घोडे गाढवे
लाळीव कुत्रे, मांजर, डुक्कर, सफेद बगळे
व्हायचे नाही त्यांच्याने हे अवघड काम
उचलू आपला खारीचा वाटा बापजादी भुतांना सारुन दूर
मिसळा त्यांच्यात ओथंबुन झोकून चिलटाएवढे देऊन काम
कोरभर कुटका खिलवून सांगून त्यांना घ्या जल्दी सामावून
सत्तेचा भ्रष्ट गुखाडीत वळवळणारे हे राजकारणी किडे
त्यांना ‘घाण’ हा शब्दच ठाऊक नाही
भ्रष्टाचारानं फुगलेली त्यांची ढेरपोट फोडायला
नीतीमत्तेची सुरी कुचकामी तर आहेच
पण लाचारीनं लथपथलेली यांची थोबाड झोडायला
षंढ संस्कृतीची हत्यारही बोथट झालिएत
या बगळ्यांनो या रे या लवकर भरभर सारे या
मजा करा रे मजा करा हा देश आपुल्या ‘बा’चा समजा
भारत माता की जय!
समाजवादी समाजरचना झिंदाबाद!
भारतीय लोकशाहीचा इजय असो!


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.