माझ्या काळ्या आया - मराठी कविता

माझ्या काळ्या आया, मराठी कविता - [Majhya Kalya Aaya,Marathi Kavita]ओरीसातील मुंडा काळ्या आयांनो तुमचं ऋण मी फेडणार आहे, रक्ताशी तुमच्या दुधाचं नातं.
माझ्या काळ्या आया - मराठी कविता | Majhya Kalya Aaya - Marathi Kavita

ओरीसातील मुंडा काळ्या आयांनो तुमचं ते ऋण मी फेडणार आहे, रक्ताशी तुमच्या दुधाचं नातं

ओरीसातील मुंडा काळ्या आयांनो तुमचं ते ऋण मी फेडणार आहे
रक्ताशी तुमच्या दुधाचं नातं साऱ्या जगाला ती सांगणार आहे
मराठी भटाचं गोरंपान पोरटं
सहज कसं हो तुम्ही छातीशी धरलंत
पिडीतांचं ओझं झपाटून पेटता
रक्ताचा आठव ओळख पटवत
दुधाची आण मी भाकून सुनावता दावेदारांशी मी भांडणार आहे
रक्ताशी तुमच्या दुधाचं नातं साऱ्या जगाला मी सांगणार आहे
विटके पटकूर अंगाला बांधून
मुक्या लाजेला दरिद्री आवर
काळ्या कटीच्या वर नाही गेला
संस्कृतीच्या त्या वस्त्रांचा वावर
दुधाची आण मी भाकून सुनावतो दावेदारांशी मी भांडणार आहे
रक्ताशी तुमच्या दुधाचं नातं साऱ्या जगाला मी सांगणार आहे.


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.