Loading ...
/* Dont copy */

माय मराठी (मराठी कविता)

माय मराठी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अमोल बारई यांची माय मराठी ही मराठी कविता (Maay Marathi Marathi Kavita).

माय मराठी (मराठी कविता)

भाषारुपी माऊली जगाची आपली माय मराठी...


माय मराठी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीअमोल बारई’ यांची ‘माय मराठी’ ही मराठी कविता.



भाषारुपी माऊली जगाची,
आपली माय मराठी ।
जिथे विविधतेने भरून वाहतो,
साहित्य ओढा प्रत्येकांसाठी ॥

अभंग, ओवी, पोवाडा, कथा,
भारुड, कविता, चारोळी ।
अखंड परंपरा ह्यांना असूनी,
आजन्म संत सांभाळी ॥

पोथी, पुस्तके, नाटक असू दे,
वा असू दे चित्रपटांची चंगळ ।
मराठी बांधवांनी नेहमीच,
आनंदली साहित्याची दंगल ॥

अखंड महाराष्ट्र हसला, रडला,
ह्यांच साहित्यामुळे ।
जनामनांत रुजली गेली,
माय मराठीची पाळेमुळे ॥

ज्ञानोबा, तुका, एकनाथ,
शिवबा, रामदास, जनाबाई ।
हीच परंपरा पुढे नेली ती,
कुसुमाग्रज, पुलं नी बहिणाबाई ॥

माझ्या भाषेला असू दे,
एक अखंड झालर प्रेमाची ।
आईप्रमाणे वात्सल्यमुर्ती ती,
फुटू दे नवी पालवी नात्याची ॥

लोप पावू नये ही प्रगल्भता,
गर्व असू द्या राजभाषेचा ।
नखशिखांत भिजुया, करुनी साजरा
गौरव दिन माय मराठीचा ॥

- अमोल बारई

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची