वरीच्या तांदळाचे सांडगे - पाककृती
वरीच्या तांदळाचे सांडगे, पाककला - [Varichya Tandalache Sandage, Recipe] उपवासाला खाता येणारे आणि वेगळ्या पद्धतीचे असे ‘वरीच्या तांदळाचे सांडगे’ तुमच्या जेवणाची चव वाढवतील.
खमंग, चविष्ट तसेच उपवासाला खाता येणारे ‘वरीच्या तांदळाचे सांडगे’
‘वरीच्या तांदळाचे सांडगे’साठी लागणारा जिन्नस
- अर्धा किलो वरी तांदूळ
- दहा हिरव्या मिरच्या
- मीठ
- जीरे
- दाण्याचे कूट
‘वरीच्या तांदळाचे सांडगे’ची पाककृती
- वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून शिजवा.
- हिरव्या मिरचीची पेस्ट करून घ्या.
- एका ताटात शिजून थंड झालेला वरीचा भात, हिरव्या मिरचीची पेस्ट, दाण्याचे कूट, जीरे व चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र कालवून गोळा बनवा.
- तयार गोळ्याचे मध्यम आकाराचे काही गोळे बनवून घ्या.
- एका ताटात किंवा परातीत ह्या गोळ्याचे छोटे - छोटे तुकडे (सांडगे) पाडा.
- १ - २ दिवस कडक उन्हात सुकवून घ्या.
- तयार सांडगे डब्यात भरून ठेवा.
- जेव्हा लागतील तेव्हा तळून खा.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.