ऑरेंज सिरप - पाककृती
ऑरेंज सिरप, पाककला - [Orange Syrup, Recipe] ‘क’ जीवनसत्वयुक्त ‘ऑरेंज सिरप’ हे उष्णता आणि थकवा घालविणारे उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यवर्धक असे पेय आहे.
क जीवनसत्वयुक्त तसेच थकवा घालविणारे ऑरेंज सिरप
‘ऑरेंज सिरप’साठी लागणारा जिन्नस
- ४ संत्री
- साखर
- २ बाटल्या सोडा
- १ मोठा कप आईस्क्रीम
‘ऑरेंज सिरप’ची पाककृती
- संत्र्याचा रस काढून त्यात चवीनुसार साखर घालावी.
- नंतर ते मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करावे.
- आयत्यावेळी त्यात सोडा ओतून वर आइस्क्रीम घालावे म्हणजे सिरप आणखी लज्जतदार लागते.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.