Loading ...

कोळंबीचा पुलाव - पाककृती

कोळंबीचा पुलाव, पाककला - [Prawns Pulao, Recipe] महाराष्ट्रातील एक मांसाहारी भाताचा प्रकार म्हणून ‘कोळंबीचा पुलाव’ बनविला जातो. कोळंबीचा पुलाव चवीला सुंदर लागतो.

कोळंबीचा पुलाव- पाककला | Prawns Pulao - Recipe

एक मांसाहारी भाताचा प्रकार ‘कोळंबीचा पुलाव’

‘कोळंबीचा पुलाव’साठी लागणारा जिन्नस

  • १ वाटी साफ केलेली कोळंबी
  • १ वाटी मटारचे दाणे
  • ३ वाट्या बासमती किंवा दिल्ली राईस
  • २ कांदे
  • ७ - ८ लसूण पाकळ्या
  • हळद
  • ४ लवंगा
  • ४ वेलदोडे

‘मसाला वाटण’साठी लागणारा जिन्नस

  • २ चमचे धणे
  • २ चमचे खसखस
  • १ चमचा शहाजिरे
  • १० - १२ काळी मिरे
  • २ - ३ दालचिनीचे तुकडे
  • १० - १२ लाल मिरच्या
  • १० - १५ काजू

‘कोळंबीचा पुलाव’ची पाककृती

  • लसूण बारीक वाटून घ्यावी. नंतर थोडीशी हळद व वाटलेली लसूण कोळंबीला लावून ठेवावी.
  • कांदा चिरुन घ्यावा व मसाला बारीक वाटून घ्यावा.
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून लवंग-वेलदोड्याची फोडणी करावी.
  • नंतर त्यात मटारचे दाणे व कोळंबी घालून जरा परतावे.
  • नंतर त्यात २ - ३ तास अगोदर धुतलेले तांदुळ घालून परतावे.
  • तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मीठ व वाटलेला मसाला घालावा.
  • नंतर मंदाग्नीवर भात शिजू द्यावा.
  • पुलाव तयार झाल्यावर त्यावर एक चमचा साजूक तूप घालावे व एका लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरम गरम वाढावा.
भाताला खाण्याच्या रंगात टाकून रंगीत कोळंबी पुलाव बनवू शकता, हा दिसायलाही सुंदर दिसतो.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची