फीरनी - पाककृती

फीरनी, पाककला - [Phirni, Recipe] तांदळाचा रवा बनवून त्यात दूध, साखर, सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे फीरनी ही सणासुदीला किंवा जेवणानंतर पुडींग म्हणून खाता येईल.
फीरनी - पाककला | Phirni - Recipe

सणासुदीला किंवा जेवणानंतरचा गोड पदार्थ अर्थात पुडींग म्हणजे फीरनी

‘फीरनी’साठी लागणारा जिन्नस

 • १ वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ
 • ४ वाट्या दूध
 • १ वाटी साखर
 • २ चमचे चारोळ्या व काजूचे कप
 • १ चमचा बेदाणे

‘फीरनी’ची पाककृती

 • तांदूळ धुवून चाळणीवर तासभर निथळत ठेवावेत. जरा ओलसर असतानाच पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये रवाळ वाटावे.
 • दुध तापत ठेवावे. साय काढू नये. दुध उकळायला लागले की तांदळाचा रवा त्यात घालावा.
 • आंच मध्यम ठेवावी व सतत ढवळत राहावे. अर्ध्या तासात रवा मऊसर शिजेल.
 • बोटाने कणी पहावी किंवा चाखून पाहावा. रवा शिजल्यानंतर साखर घालावी व ढवळत राहावे.
 • मिश्रण पुन्हा थोडे पातळसर होईल. ते दाटसर होईपर्यंत चुलीवर ठेवावे व ढवळावे.
 • घट्ट होऊ लागले की शोभिवंत भांड्यात ओतावे त्यात वेलचीपूड किंवा एसेन्स घालावा.
 • थंड झाले की चारोळ्या, काजू, बेदाणा घालावा. सुका मेवा नसला तरी चालेल.
 • फ्रीजमध्ये ठेवून थंड करावी व पुडिंग म्हणून जेवणानंतर लहान बाऊलमध्ये द्यावी.
खास प्रसंग चांदीचा वर्ख किंवा देशी गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवावे.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.