दही मिसळ - पाककृती
दही मिसळ, पाककला - [Dahi Misal, Recipe] नाव ऐकल्यावरच तोंडाला पाणी आणणारी ‘दही मिसळ’ ही चटपटीत जेवणातील भाजी तसेच न्याहारीसाठी पावासोबत खाता येते.
कोकणची खासियत असलेली दही मिसळ
‘दही मिसळ’साठी लागणारा जिन्नस
- ५०० ग्रॅम मटकी
- ७ - ८ हिरव्या मिरच्या
- १/२ नारळ
- लिंबाएवढा गूळ
- मीठ
- २ मोठे बारीक चिरलेले कांदे
- २ मोठे उकडलेले चौकोनी तुकडे करुन बटाटे
- १०० ग्रॅम बारीक शेव
- १०० ग्रॅम चिवडा
- २ वाट्या दही
‘दही मिसळ’ची पाककृती
- आदल्या दिवशी मटकी भिजत घालावी. तिला मोड आल्यावर मटकी निवडून घ्यावी.
- तेलात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी. त्यात मोड आलेली मटकी घालावी.
- जरा परतून थोडे पाणी घालावे व मटकी शिजू द्यावी.
- मटकी शिजल्यावर त्यात वाटलेल्या मिरच्या, गूळ व मीठ घालून उसळ बनवावी.
- कोथिंबीर व नारळ घालून उसळ खाली उतरवावी.
- उसळीत पाणी अजिबात राहता नये. उसळ गार होऊ द्यावी.
- आयत्या वेळी प्लेटमध्ये २ डाव उसळ घालावी.
- उसळवर थोडा बारीक चिरलेला कांदा घालवा. बटाट्याच्या फोडी घालाव्यात.
- नंतर त्यावर चिवडा व बारीक शेव घालावी.
- वरती १ टेबलस्पून गोड व घट्ट दही घालावे व बटर लावून भाजलेल्या पावाबरोबर सर्व्ह करावे.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.