गाजर कोबीचे सॅलड - पाककृती

गाजर कोबीचे सॅलड, पाककला - [Gajar Kobi Salad, Recipe] पौष्टिक असलेले ‘गाजर कोबीचे सॅलड’ जेवणाची चव वाढवते.
गाजर कोबीचे सॅलड - पाककला | Gajar Kobi Salad - Recipe

पौष्टिक असलेले गाजर कोबीचे सॅलड

‘गाजर कोबीचे सॅलड’साठी लागणारा जिन्नस

 • २ वाट्या बारीक चिरलेली कोबी
 • १ वाटी बारीक चिरलेली गाजरे
 • १ वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची
 • २ चमचे किसलेला कांदा
 • अर्धी वाटी दही
 • अर्धी वाटी क्रीम किंवा मेयोनेझ
 • १ चमचा साखर
 • १ चमचा मीठ
 • पाव चमचा मिरपूड

‘गाजर कोबीचे सॅलड’ची पाककृती

 • भाज्या एकत्र कराव्या. दही, क्रीम, साखर, मीठ व मिरपूड घालून वेगळे ढवळावे.
 • बाजारी क्रीम नसल्यास घरची साय घोटून घालावी.
 • तेही न जमल्यास दह्याचे प्रमाण दुप्पट करावे. मात्र दही आंबट नसावे.
 • पसरट भांड्यात भाज्या घालून त्यावर दही हलकेच ओतावे.
 • अलगद भांडे मिसळावे. फ्रीजमधे ठेवून थंडगार झाल्यानंतर खावे.

आवडीनुसार भाजलेले किंवा भिजवलेले शेंगदाणे, काजू किंवा अक्रोडचा भरड चुरा किंवा भाजके चणे करून घालावे.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.