कारल्याचे पंचामृत - पाककृती
कारल्याचे पंचामृत, पाककला - [Karalyache Panchamrut, Recipe] शरीरात थंडावा आणि रक्त शुद्धीकरण यामुळे मानसिक शांतता देणारे ‘कारल्याचे पंचामृत’ अत्यंत उपयुक्त आणि पौष्टिक असा पदार्थ आहे, हा मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ सणासुदीला हमखास केला जातो.
सणासुदीत खाल्ला जाणारा पौष्टिक आणि महाराष्ट्रीय पदार्थ ‘कारल्याचे पंचामृत’
‘कारल्याचे पंचामृत’साठी लागणारा जिन्नस
- २०० ग्रॅम कारली
- अर्धी वाटी खोबऱ्याचे पातळ तुकडे
- अर्धी वाटी तिळाचे कूट
- अर्धी वाटी दाण्याचे कूट
- ५-६ हिरव्या मिरच्या
- ५-६ कडुलिंबाची पाने
- अर्धी वाटी चिंचेचा कोळ
- १ मोठा गुळाचा खडा
- मीठ
- तेल
- मोहरी
- हळद
- हिंग
‘कारल्याचे पंचामृत’ची पाककृती
- प्रथम कारली बिया काढून बारीक चिरावीत व धुवून पिळून घ्यावीत.
- नंतर तेलामध्ये हिंग, हळद, मोहरी, कडुलिंब घालून फोडणी करावी आणि त्यात कारली व पाणी घालून चांगले शिजवावे.
- चिंचेचा कोळ, तिळाचे कूट, दाण्याचे कूट व खोबऱ्याचे तुकडे शिजत आलेल्या कारल्यात घालावेत.
- नंतर त्यात मिरचीचे तुकडे, मीठ व गूळ घालावा.
- चांगले शिजल्यावर कारल्याचे पंचामृत तयार होते.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.