बेसन लाडू - पाककृती
बेसन लाडू, पाककला - [Besan Ladu, Recipe] दिवाळीच्या फराळातील एक गोड पदार्थ म्हणजे ‘बेसन लाडू’ साच्यातून काढल्यास त्याच्या आकारामुळे नाविन्य निर्माण होते.
दिवाळीतला एक गोड पदार्थ ‘बेसन लाडू’
‘बेसन लाडू’साठी लागणारा जिन्नस
- ३ वाट्या हरभऱ्याच्या डाळीचे रवाळ पीठ (बेसन)
- दीड वाटी तूप
- पाव वाटी दूध
- ३ वाटचा पिठीसाखर
- ७-८ वेलदोड्यांची पूड
- अर्धा चमचा जायफळ पूड
- २५ ग्रॅम बेदाणा
- १० ग्रॅम काजूचे काप
‘बेसन लाडू’ची पाककृती
- तुपावर डाळीचे पीठ खमंग भाजून घ्या.
- छान वास आला की त्यावर दूध शिंपडून बाजूला ठेवा.
- मिश्रण कोमट झाले की त्यात पिठीसाखर, वेलदोडे, जायफळ, बेदाणा, काजू घालून मिश्रण कालवा.
- नंतर त्याचे बेताच्या आकाराचे लाडू वळा.
मोदकाच्या साच्याला पातळ तुपाचा हात फिरवावा व प्रत्येक लाडू साच्यातून काढावा.
आकाराच्या नाविन्यामुळे बेसन लाडू छान दिसतात.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.