मटार पनीर कबाब - पाककृती
मटार पनीर कबाब, पाककला - [Mutter Paneer Kebab, Recipe] चटपटीत असे ‘मटार पनीर कबाब’ हे न्याहारी किंवा मधल्या वेळेत खायला दिल्यास सर्वांच्याच आवडीचे होईल.
चटपटीत मटार पनीर कबाब
‘मटार पनीर कबाब’साठी लागणारा जिन्नस
- २५० ग्रॅम मटार दाणे
- २०० ग्रॅम पनीर
- ५-६ ब्रेडचे स्लाईस
- १ टे. स्पून खसखस
- २ टे. स्पून कॉर्नफ्लोअर
- लसूण पाकळ्या
- १ कांदा
- १ टी. स्पून गरम मसाला
- पुदिन्याची पाने
- तळण्यासाठी तेल
- मीठ
‘मटार पनीर कबाब’ची पाककृती
- मटार दाणे, पनीर आणि ब्रेडचे स्लाईसेस मिक्सरमधून वेगवेगळे वाटून घ्यावेत.
- हिरव्या मिरच्या, खसखस, लसूण, कांदा, पुदिन्याची पाने यांची पेस्ट बनवून घ्यावी.
- वरील सर्व साहित्य, मीठ आणि गरम मसाला त्यात एकत्र करुन हे मिश्रण मळून घ्यावे.
- या मिश्रणाचे जरा लांबट (अंडाकार) गोळे करुन ते कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून गरम तेलात लालसर तळून घ्यावेत.
- गरम गरम मटार पनीर कबाब टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खायला द्यावेत.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.