बटाटा पॅटी - पाककृती

बटाटा पॅटी, पाककला - [Batata Patty, Recipe] ‘बटाटा पॅटी’ ही आपण नाश्त्यामध्ये, मधल्या वेळेत किंवा जेवणात स्टार्टर म्हणून खाता येऊ शकतो, तसेच ब्रेड किंवा डोनट मध्ये ही बटाटा पॅटी घालून सॅंडविच, बर्गर आणि रगडा पॅटिसही बनवू शकता.
बटाटा पॅटी- पाककला | Batata Patty - Recipe

खास लहान मुलांसाठी तसेच स्टार्टर म्हणून खाता येणारी चटपटीत बटाटा पॅटी

‘बटाटा पॅटी’साठी लागणारा जिन्नस

 • २५० ग्रॅम उकडलेल्या बटाट्यांची पिट्ठी
 • ५० ग्रॅम उकडलेले हिरवे मटार दाणे
 • २ ब्रेडचा चुरा
 • १/२ कप कापलेली कोथिंबीर
 • १ कापलेला कांदा
 • २ कापलेल्या हिरव्या मिरच्या
 • १/२ चमचा गरम मसाला
 • १/२ चमचा आमचूर
 • तळणासाठी तेल
 • चवीनुसार मीठ

‘बटाटा पॅटी’ची पाककृती

 • बटाटा उकडून चांगला स्मॅश करावा (पिठ्ठी बनवावी).
 • तयार पिठ्ठी मध्ये उकडलेला मटार, कोथिंबीर, कांदा, हिरव्या मिरच्या, गरम मसाला, मीठ व आमचूर मिळवावे.
 • पिट्ठीच्या गोल गोल गोळ्या बनवून तळहातावर दाबून चपट्या कराव्यात किंवा तुम्हाला हव्या असल्यास गोळेच ठेवावेत.
 • कढईत तेल गरम करावे.
 • तयार गोळे ब्रेडचा चुर्‍यामध्ये लपेटुन गरम तेलात तळावे.
 • चांगला सोनेरी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून काढून घ्यावेत.
 • चिंचेची चटणी किंवा पुदीना चटणी बरोबर तसेच लहान मुलांना सॉस सोबत नाष्ट्याच्या वेळी/टिफिनमध्ये द्यावे.
बटाटा पॅटी चवीला फार चटपटीत लागतात. तुम्ही घरी किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून वाढू शकता.

बटाटा पॅटी वापरून तुम्ही रगडा पॅटिस, सॅंडविच, बर्गर वगैरे बनवू शकता.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.