Loading ...

पोळ्यांचा चुरमा - पाककृती (स्वाती खंदारे)

पोळ्यांचा चुरमा (पाककला) - दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर शिल्लक पोळी - भाकरीची एक खमंग पाककृती म्हणजे पोळ्यांचा चुरमा [Poli Churma Recipe].

पोळ्यांचा चुरमा - पाककृती (स्वाती खंदारे)

मधल्या भुकेसाठी तसेच झटपट होणारा ‘पोळ्यांचा चुरमा’


पोळ्यांचा चुरमा - पाककृती (स्वाती खंदारे)

(Poli Churma Recipe) दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर जर काही पोळ्या किंवा भाकर्‍या शिल्लक राहिल्या असतील तर त्यातुन पोळ्यांचा चुरमा ही एक खमंग पाककृती बनवली जाऊ शकते.



पोळ्यांचा चुरमा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • ५ - ६ पोळ्या (किंवा शिल्लक चपात्या/भाकर्‍या)
  • १ कांदा
  • तिखट
  • मीठ
  • हळद
  • १ चमचा साखर
  • कडीपत्ता
  • जीरे
  • मोहरी (फोडणीसाठी)

पोळ्यांचा चुरमा करण्याची पाककृती


  • पोळ्यांचा बारीक चुरा करावा (अगदी बारीक होण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल.) त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे.
  • कांदा बारीक चिरावा. पातेल्यात तेल टाकून त्यात हिंग, कडीपत्ता, जीरे. मोहरीची फोडणी द्यावी.
  • नंतर त्यात कांदा टाकावा व मऊ शिजवावा. त्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे.
  • कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ टाकून चांगले परतून घ्यावे.
  • त्यामध्ये सर्व बारीक केलेला चुरमा टाकावा व चांगला परतून घ्यावा.
  • कोरडा वाटत असल्यास त्यावर थोडे पाणी शिंपडावे.
  • वरुन थोडीशी साखर व बारीक चिरुन कोथिंबीर पेरावी व झाकण ठेवून २-३ मिनीटे शिजवावे व गरमागरम वाढावे.

पोळ्या शिल्लक राहिल्या असल्यास अशा प्रकारचा चुरमा चांगला लागतो. त्यामूळे शिल्लक पोळ्या टाकून द्याव्या लागत नाहीत; ह्यात तुम्ही शेंगदाणे, शिल्लक भात किंवा इतर आवडीच्या वस्तू घालून चव वाढवू शकता.


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


सर्व विभाग / जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची