आले आवळा पाचक वड्या - पाककृती

आले आवळा पाचक वड्या, पाककला - [Aale Aavala Pachak Vadya, Recipe] अन्नपचन तसेच खोकल्यासाठी उपयुक्त ‘आले आवळा पाचक वड्या’.
आले आवळा पाचक वड्या - पाककला | Ginger Awala Pachak Vadya - Recipe

अन्नपचन तसेच खोकल्यासाठी उपयुक्त ‘आले आवळा पाचक वड्या’


आले आवळा पाचक वड्या - थंडीच्या दिवसात, अन्नपचनास तसेच खोकला आल्यास आणि प्रवासात उपयोगी पडण्यार्‍या चविष्ट अश्या ‘आले आवळा पाचक वड्या’ घरी लगेच बनवून ठेवा.आले आवळा पाचक वड्या करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • २४० ग्रॅम डोंगरी आवळे
 • एक टेबलस्पून आल्याची पेस्ट
 • एक टेबलस्पून ओवा
 • मीठ
 • चिमूटभर साखर
 • एक चमचा जिरे पावडर

आले आवळा पाचक वड्या करण्याची पाककृती


 • आवळे स्वच्छ धुवून कोरडे करा.
 • आवळे किसून घ्या.
 • त्यात उरलेले सर्व जिन्नस टाका आणि हाताने कालवा.
 • तळहातावर लहान वड्या थापा.
 • ते ताटात ठेवून तीन-चार दिवस उन्हात ठेवा.
 • सुकल्यावर त्या हवाबंद डब्यात ठेवा.

आले आवळा पाचक वड्या


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.