गोड शंकरपाळी - पाककृती

गोड शंकरपाळी, पाककला - [God Shankarpali, Recipe] सणासुदीला खासकरुन केली जाणारी खुसखुशीत ‘गोड शंकरपाळी’ तुम्ही इतर वेळीही करुन मुलांना पटकन खाण्यासाठी देवू शकता. खुससुशीत गोड शंकरपाळी झटपट तयार..!
गोड शंकरपाळी- पाककला | God Shankarpali - Recipe

सणासुदीत खाल्ली जाणारी गोड आणि खुसखुशीत ‘गोड शंकरपाळी’

‘गोड शंकरपाळी’साठी लागणारा जिन्नस

  • ५०० ग्रॅम मैदा
  • १२५ ग्रॅम पिठीसाखर
  • ३ चमचा घट्ट डालडाचे मोहन
  • अर्धा चमचा मीठ
  • ४-५ वेलदोड्याची पूड

‘गोड शंकरपाळी’ची पाककृती

  • डालडा खूप फेसून घ्या. नंतर त्यात पिठीसाखर घालून फेसा.
  • नंतर त्यात मैदा, वेलदोड्याची पूड आणि मीठ घालून दुधात किंवा पाण्यात पीठ घट्ट भिजवा.
  • मळलेले पीठ तासभर झाकून ठेवा.
  • तासाभराने चांगले मळून त्याचे शंकरपाळ्या बनवून तेलात तळून घ्या.
  • तयार आहेत खुसखुशीत गोड शंकरपाळी.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.