देशी कैरीचे लोणचे - पाककृती

देशी कैरीचे लोणचे, पाककला - [Deshi Kairiche Lonache, Recipe] चटपटीत आणि बघताच क्षणी तोंडाला पाणी आणणारे ‘देशी कैरीचे लोणचे’ घरच्या घरी बनवा.
देशी कैरीचे लोणचे- पाककला | Deshi Kairiche Lonache - Recipe

तोंडाला पाणी आणणारे ‘देशी कैरीचे लोणचे’

देशी कैरीच्या लोणच्यासाठी लागणारा जिन्नस

 • ५ कि. कैरी
 • २५० ग्रा. शोप
 • १०० हळद
 • २५ ग्रा. लाल मिरची
 • २५० ग्रा. मीठ
 • ५० ग्रा. कलौजी
 • २५० ग्रा. मेथी
 • १ लि. मोहरी तेल

देशी कैरीच्या लोणच्याची पाककृती

 • देशी कैरी घेवुन त्यास १ दिवस पाण्यात भिजवाव्यात.
 • आता त्या पाण्यातून काढुन चांगल्या तर्‍हेने पुसून सुकवून घ्यावात.
 • या नंतर अडकित्ता घेऊन त्याने कैरीचे चार किंवा आठ आठ खाप बनवाव्यात.
 • त्यांच्या कोयी काढुन टाकाव्यात.
 • शोप बारीक (अर्धवट कुटलेली) करावी.
 • मेथी व कलौजी साफ करून घ्यावी.
 • हळद, मिरची व मीठ वाटुन घ्यावे.
 • वरील सर्व मसाले एकत्र करून त्यामध्ये कैरीचे कापलेले खाप मिळवावे.
 • सर्व साहित्य चिनी मातीच्या किंवा मातीच्या भांड्यात भरून त्यामध्ये १ लि. मोहरी तेल टाकून उन्हात ठेवावे.
 • १० - १५ दिवसात देशी कैरीचे लोणचे तयार होईल.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.