चिकन लिव्हर चिली - पाककृती

चिकन लिव्हर चिली, पाककला - [Chicken Liver Chilli, Recipe] तोंडाला पाणी सुटणारे चटपटीत ‘चिकन लिव्हर चिली’ मांसाहारी व्यक्तिंनी एकदा खाऊन बघायला हरकत नाही. तसेच मुलांनाही भाकरी किंवा नान सोबत खायला आवडेल.
चिकन लिव्हर चिली - पाककला | Chicken Liver Chilli - Recipe

तोंडाला पाणी सुटणारे चटपटीत चिकन लिव्हर चिली

‘चिकन लिव्हर चिली’साठी लागणारा जिन्नस

 • पाव किलो चिकनचे लिव्हर
 • २ चमचे आले-लसूण पेस्ट
 • कोथिंबीर पेस्ट
 • लिंबूरस
 • ५-६ लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरून)
 • २ सिमला मिरची (उभे काप करून)
 • १ कांदा (मोठे तुकडे करून)
 • अर्धा वाटी कांद्याची पात
 • १ चमचा सोयासॉस
 • तेल
 • चवीनुसार मीठ
 • १ चमचा गरम मसाला

चिकन लिव्हर चिलीची पाककृती

 • चिकनच्या लिव्हरला आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट व लिंबूरस लावून अर्धा तास मॅरीनेट करत ठेवा.
 • पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या परतवून घ्या.
 • आता त्यात मॅरीनेट केलेले लिव्हर घालून शिजू द्या. थोडेसे पाणी घाला.
 • त्यातील पाणी आटल्यावर त्यात कांदा, सिमला मिरची व चिरलेली कांद्याची पात घालून परता.
 • त्यात सोयासॉस व मीठ घालून एक वाफ येऊ द्या.
 • चिकन लिव्हर चिली गरमागरम सर्व्ह करा.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.