स्वीट कॉर्न सूप - पाककृती

स्वीट कॉर्न सूप, पाककला - [Sweet Corn Soup, Recipe] पौष्टिक आणि जेवणाअगोदर खाल्यामूळे भूक वाढवणारे स्वीट कॉर्न सूप घरी बनवता येईल.
स्वीट कॉर्न सूप - पाककला | Sweet Corn Soup - Recipe

पौष्टिक आणि भूक वाढवणारे ‘स्वीट कॉर्न सूप’


स्वीट कॉर्न सूपस्वीट कॉर्न सूप करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • १ टिन स्वीट कॉर्न
 • २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर
 • २ मोठे चमचे लोणी
 • १/२ छोटा चमचा अजीनोमोटो पावडर
 • १/२ कप पत्ता कोबी
 • १ गाजर
 • १ कांदा
 • २ चीज क्यूब

स्वीट कॉर्न सूप करण्याची पाककृती


 • कोबी, गाजर व कांदा बारीक चिरुन घ्या.
 • १/२ कप पाण्यात कॉर्नफ्लावर टाका.
 • एका भांड्यात टिनमधील स्वीट कॉर्न, कॉर्नफ्लावर व ६ कप पाणी टाकून गॅसवर ठेवा.
 • उकळी आल्यावर लोणी, अजीनोमोटो पावडर टाकून १० मिनीटे शिजवा.
 • कांदा, गाजर, व कोबी टाकून ५ मिनीटे शिजवा.
 • गॅस बंद करून सूपवर चीज किसून टाका. गरम-गरम वाढा.

स्वीट कॉर्न सूप


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.