चकली - पाककृती

चकली, पाककला - [Chakali, Recipe] दिवाळीच्या फराळातील महत्त्वाचा खमंग व खुसखुशीत पदार्थ म्हणजे चकली.
चकली- पाककला | Chakali - Recipe

दिवाळीतला खमंग व खुसखुशीत पदार्थ चकली


चकली - दिवाळीच्या फराळातील महत्त्वाचा खमंग व खुसखुशीत पदार्थ जी सर्वांना आवडते व तोंडाला चव आणते ती म्हणजे ‘चकली’ जी इतर वेळीही झटपट करून खाऊ शकतो.चकली करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • १ कप तांदळाचे पीठ
 • अर्धा कप बेसन
 • २ चमचे लोणी
 • १ चमचा तेल
 • १ चमचा तिखट
 • मीठ
 • तळणासाठी तेल

चकली करण्याची पाककृती


 • एका परातीत तांदळाचे पीठ, बेसन, लोणी, १ चमचा तेल, तिखट, चवीनुसार मीठ आणि वाटल्यास सफेद तीळ घ्या.
 • यामध्ये गरम पाणी टाकून कणके सारखे मळा. ५ ते १० मिनीटे बाजूला ठेवा.
 • गॅसवरती एका कढईत तेल तापवत ठेवा.
 • तयार पीठाचे छोटे छोटे लांबट गोळे करून चकलीच्या साच्यात भरून गोल आकारात प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडा.
 • तेल तापले की त्यात चकल्या सोडून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.
 • तयार आहेत खमंग व खुशखुशीत चकल्या.

या चकल्या हवाबंद डब्यात बरेच दिवस साठवून ठेवता येतात.


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.