केळ्याचे पीठ - पाककृती
केळ्याचे पीठ, पाककला - [Kelyache Pith, Recipe] उपवासाला चालणारे तसेच मधल्या वेळेत थालिपीठ करता येईल यासाठी हे ‘केळ्याचे पीठ’ वापरु शकता.
उपवासाला थालिपीठ करता येणारे केळ्याचे पीठ
‘केळ्याचे पीठ’च्या सारणासाठीचे जिन्नस
- एक डझन कच्ची केळी
- एक वाटी साबुदाणा
- हिरवी मिरचीची पेस्ट
- जीरे
- मीठ
‘केळ्याचे पीठ’ची पाककृती
- कच्ची केळी शिजवून गार झाल्यावर साले काढून घ्या.
- नंतर मिक्सर अथवा पुरणयंत्रातून बारीक करून घ्या.
- त्यात एक वाटी भिजवलेला साबुदाणा घाला.
- आता जीरे, मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट घालून चांगले एकत्र गोळा बनवा.
- तयार गोळा चकलीच्या भांड्यात घालून प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडा आणि उन्हात वाळवा.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.