चायनीज गाजर-काकडीची कोशिंबीर - पाककृती

चायनीज गाजर-काकडीची कोशिंबीर, पाककला - [Chinese Gajar-Kakadi Koshimbir, Recipe] चायनीज पद्धतीची गाजर-काकडीची कोशिंबीर, चायनीज पद्धतीच्या पदार्थांची आवड असल्यास आपल्याला कोशिंबीरीचा हा प्रकार नक्कीच आवडेल, रूचीपालट म्हणून एकवेळ नक्की करून पहावा.
चायनीज गाजर-काकडीची कोशिंबीर - पाककला | Chinese Gajar-Kakadi Koshimbir - Recipe

चायनीज पद्धतीची चायनीज गाजर-काकडीची कोशिंबीर

‘चायनीज गाजर-काकडीची कोशिंबीर’साठी लागणारा जिन्नस

 • २ मध्यम काकड्या
 • १ अननस चकती
 • १ चमचा मीठ
 • १ चमचा सोया सॉस
 • १ चमचा व्हिनेगर
 • १ चमचा साखर
 • १ चमचा रिफाइंड तेल

‘चायनीज गाजर-काकडीची कोशिंबीर’ची पाककृती

 • काकड्या सोलून व गाजरे खरवडून त्याचे १ इंच लांब व एक अष्टमांश इंच रुंद अशा कापट्या चिरण्याचा प्रयत्न करावा. जमल्यास लहान पातळ तुकडे करावे.
 • त्यावर मीठ शिंपडून बाजूला ठेवावे.
 • एका उथळ प्लेटमध्ये किंवा छोट्या सुबक ट्रेमध्ये निम्म्या काकडीच्या कापट्या ओळीने मांडाव्या.
 • तशाच गाजराच्या कापट्या (निम्म्या) मांडाव्या.
 • उरलेल्या कापट्या पहिल्या ओळीवर मांडाव्या व आडव्या ओळीत रचाव्या.
 • हे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे.
 • एका वाडग्यात साखर, व्हिनीगर, सोया सॉस व तेल मिसळून सॉस तयार करावा. असल्यास चिमूटभर अजिनोमोटो घालावे. नसल्यास चिमूटभर साधे मीठ घालावे.
 • सॉसही फ्रीजमध्ये ठेवावा.
 • वाढण्यापूर्वी हा सॉस कोशिंबीरीवर ओतावा व अननसाचे तुकडे वरून घालून सजवावे.
 • कापट्या चिरणे जमले नाही तर नेहमीसारखे कोशिंबीर व जमले तर चायनीज सॅलड बनवावे!
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.