बटाट्याचे पुडिंग - पाककृती

बटाट्याचे पुडिंग, पाककला - [Batatyache Pudding, Recipe] बटाटे, खवा, ओले खोबरे आणि केशर घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे ‘बटाट्याचे पुडिंग’ उपवासालाही खाता येईल.
बटाट्याचे पुडिंग - पाककला | Batatyache Pudding - Recipe

उपवासाला चालणारा गोड पदार्थ बटाट्याचे पुडिंग

‘बटाट्याचे पुडिंग’साठी लागणारा जिन्नस

 • ५०० ग्रॅम बटाटे
 • २५० ग्रॅम साखर
 • १०० ग्रॅम खवा
 • अर्धी वाटी तूप
 • २-३ वेलदोडे पूड
 • २ चिमट्या केशर
 • १ वाटी ओले खोबरे.
 • बदाम
 • काजू

‘बटाट्याचे पुडिंग’ची पाककृती

 • केशर गरम करून बारीक करावे व थोड्या गरम पाण्यात शिजत ठेवावे.
 • बटाटे उकडून सोलावे व गरमच असताना पुरणयंत्रात घालून बारीक करावे किंवा किसणीने किसावे.
 • साखरेत अर्धा वाटी पाणी घालून चुलीवर ठेवावे व दोनतारी पाक करावा
 • जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की त्यावर बटाट्याचे मिश्रण परतावे.
 • भिजलेले केशर पाकात घालावे व पाक बटाट्यावर ओतावा.
 • खवा मोकळा, कुस्करून घालावा.
 • मिश्रण एकजीव होईपर्यंत सतत ढवळावे.
 • खाली उतरवून सुबकशा भांड्यात घालावे. वरून वेलदोडे पूड, बदाम, काजू व असल्यास थोडे ओले खोबरे घालावे. तयार आहे बटाट्याचे पुडिंग.
लहान मुलांसाठी व उपवास असलेल्या मंडळींसाठी एक वेगळा पदार्थ.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.