टोमॅटो भात - पाककृती

टोमॅटो भात, पाककला - [Tomato Rice, Recipe] हलका - फुलका तसेच टोमॅटोची चव असलेला खासकरुन रात्रीच्या जेवणात सुयोग्य असा हा ‘टोमॅटो भात’ सर्वांना आवडेल.
टोमॅटो भात- पाककला | Tomato Rice - Recipe

हलका - फुलका ‘टोमॅटो भात’

‘टोमॅटो भात’साठी लागणारा जिन्नस

 • २ वाट्या तांदूळ
 • २५० ग्रॅम टोमॅटो
 • २ चमचे तूप
 • ४ लवंगा
 • १ कांदा
 • १ वाटी ओले खोबरे
 • ४ - ५ हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
 • ४ - ५ लसूण पाकळ्या
 • १ इंच आले
 • २ दालचिनीचे लहान तुकडे
 • ८ - १० काळी मिरी
 • १ लिंबू
 • १ चमचा मीठ (किंवा जास्त)
 • १ चमचा साखर

‘टोमॅटो भात‘’ची पाककृती

 • तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावेत.
 • टोमॅटो बारीक चिरून ४ वाट्या पाण्यात शिजवावेत.
 • पुरणयंत्रावर पाण्यासकट गाळून घ्यावे.
 • भाताच्या पातेल्यात तूप तापले की त्यामध्ये लवंगा, काळीमिरी, दालचिनी घालून कांदा परतावा.
 • एकीकडे आले - लसूण वाटून घ्यावे.
 • मिरच्या उभ्या चिराव्या. कांदा लालसर झाला की तांदूळ परतावेत व वाटलेली गोळी व मिरच्या घालावे. मीठ व साखर घालावी.
 • गाळून घेतलेले टोमॅटोचे पाणी घालावे.
 • मंद आंचेवर भात शिजवावा.
 • वाढताना त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.
जास्त आंबट आवडत असेल त्यांच्यासाठी लिंबाची फोड द्यावी.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.