लिंबाचे गोड लोणचे - पाककृती

लिंबाचे गोड लोणचे, पाककला - [Sweet Lime Pickle, Recipe] आंबट गुणधर्म असलेल्या ‘लिंबाचे गोड लोणचे’ घरच्या घरी बनवून खाऊ शकता.
लिंबाचे गोड लोणचे- पाककला | Sweet Lime Pickle - Recipe

चटकदार आणि आंबट - गोड ‘लिंबाचे गोड लोणचे’

‘लिंबाचे गोड लोणचे’साठी लागणारा जिन्नस

 • ५ किलो लिंबु
 • २०० ग्रॅ. काळी मिरची
 • १०० ग्रॅ. मोठी वेलची
 • ५० ग्रॅ. जीरे
 • १० ग्रॅ. प्रत्येक दालचिनी
 • तेजपान
 • ५० ग्रॅ. लवंग
 • ५ नग जायफळ
 • १०० ग्रॅ. सिरका
 • ३ कि. साखर
 • ५०० ग्रॅ. आले
 • ४०० ग्रॅ. सेंधा मीठ
 • १०० ग्रॅ. काळे मीठ
 • विनेगर

‘लिंबाचे गोड लोणचे’ची पाककृती

 • मोठ्या आकारात लिंबू घ्यावे.
 • धुवून पुसून उन्हात सुकवावे.
 • नंतर चार चार खापा या प्रकारे कापाव्या की त्या एका बाजुने जोडलेल्या राहतील.
 • आले सोलुन बारीक करावे.
 • सर्व मसाल्यांना अर्धवट कुटुन घ्यावे.
 • नंतर त्यात साखर व विनेगर मिळवून तयार मिश्रण लिंबामध्ये भरावे.
 • तयार लिंबाना बरणीत ठेवावे व बरणीस चांगल्या तर्‍हेने बंद करून उन्हात ठेवावे.
 • १०-१५ दिवसात लिंबाचे गोड लोणचे तयार होऊन जाईल.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.