चीजची बिस्कीटे - पाककृती

चीजची बिस्कीटे, पाककला - [Cheese Biscuit, Recipe] मैदा, लोणी व चीज घालून तयार केलेली खुसखुशीत, खमंग अशी चीजची बिस्कीटे मुलांना मधल्या वेळेत किंवा डब्यामध्ये खायला देता येईल.
चीजची बिस्कीटे - पाककला | Cheese Biscuit - Recipe

खमंग, खुसखुशीत व मुलांच्या आवडीची चीजची बिस्कीटे

‘चीजची बिस्कीटे’साठी लागणारा जिन्नस
  • १०० ग्रॅम मैदा
  • ५० ग्रॅम लोणी
  • २५ ग्रॅम चीज
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • १ चिमटी लाल तिखट (ऐच्छिक)

‘चीजची बिस्कीटे’ची पाककृती
  • चीज किसून घ्यावा. लोणी हाताने फेसावे. त्यात चीज व मैदा मिसळावा.
  • चांगले मिसळले की त्यात बेकींग पावडर व तिखट घालावे. पीठ दहा मिनिटे झाकून ठेवावे.
  • पिठाची पाव इंच जाडीची पोळी लाटावी. लाटण्यापूर्वी थोडा मैदा पोळपाटावर भुरभुरावा म्हणजे पोळी चिकटणार नाही.
  • साचा असल्यास त्याचा वापर करावा व लहान बिस्कीटे कापावी किंवा सुरीने चौकोनी तुकडे करावे.
  • तुपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये ही बिस्कीटे मांडावी व कमी तापमानावर सुमारे पंधरा मिनिटे ओव्हनमध्ये भाजावी.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.