सफरचंदाचा मुरंबा - पाककृती
सफरचंदाचा मुरंबा, पाककला - [Safarchandacha Muramba, Recipe] जीवनसत्व अ, फायबरयुक्त असा ‘सफरचंदाचा मुरंबा’ हा हृदयरोगाच्या व्यक्तींना फायदेशीर आहे.
हृदयाच्या रोग्यांना फायदेशीर ‘सफरचंदाचा मुरंबा’
‘सफरचंदाचा मुरंबा’साठी लागणारा जिन्नस
- १ किलो सफरचंद
- १ कि. साखर
- २ चमचे मीठ
- २ लिंबाचा रस
- आवश्यकतेनुसार पाणी
‘सफरचंदाचा मुरंबा’ची पाककृती
- सर्वप्रथम सफरचंद पाण्यातुन काढावे व पुसून घ्यावेते.
- सफरचंद सोलून त्यांचा मधला भाग व बी काढुन टाकावे.
- सफरचंदाच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात.
- गॅसवर एका भांड्यात साखर घालून आवश्यकतेनुसार पाणी व लिंबाचा रस टाकुन एकतारी पाक बनवावा.
- तयार पाकात सफरचंदाच्या फोडी टाकाव्यात.
- फोडी नरम झाल्यावर पाकासहित हा सफरचंदाचा मुरंबा काचेच्या बरणीत भरावा.
सफरचंदाचा मुरंबा हृदयाच्या रोग्यांना फायदेशीर आहे.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.