Loading ...

भाजीचे रोल्स - पाककृती (स्वाती खंदारे)

भाजीचे रोल्स (पाककला) - सर्व भाज्यांनी युक्त, चटपटीत अशी ही रोलची पोटभर न्याहारी [Vegetable Rolls Recipe].

भाजीचे रोल्स - पाककृती (स्वाती खंदारे)

खास लहान मुलांसाठी सर्व भाज्यांनी युक्त असलेले भाजीचे रोल्स


भाजीचे रोल्स - पाककृती (स्वाती खंदारे)

(Vegetable Rolls Recipe) पोटभर न्याहारी म्हणून ‘भाजीचे रोल्स’ खाता येतील तसेच सर्व भाज्यायुक्त व चटपटीत असलेला हा रोल लहान मुलांना मधल्या वेळेत भूक लागल्यास खायला देता येईल.



भाजीचे रोल्स करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • ३ कप मैदा
  • २ कप दूध
  • २ अंडी
  • चवीपुरते मीठ

भाजीचे रोल्ससाठी आतील सारणास लागणारा जिन्नस


  • २-३ गाजरं
  • १/२ वाटी मटारचे दाणे
  • ७ - ८ बटाटे
  • २ कांदे
  • मीठ
  • मिरची
  • आले
  • लसूण
  • कोथिंबीर
  • अर्धे लिंबू

भाजीचे रोल्स करण्याची पाककृती


  • बटाट्याची साले काढून बारीक फोडी कराव्यात. गाजर व कांदाही बारीक चिरुन घ्यावा. आले, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात.
  • थोड्या डालडयावर कांदा बदामी रंगावर येईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात बाकीच्या भाज्या घालून अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्यात.
  • भाज्या मऊसर शिजल्यावर सर्व पाणी आटवून घ्यावे. नंतर त्यात मीठ, वाटलेला मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून भाजी थाळीत काढून ठेवावी.
  • दुधात अंड्यातले पिवळे घालून फेटावे. नंतर त्यात मैदा घालून पीठ तयार करावे. मीठ घालावे. एक तासभर मिश्रण तसेच ठेवावे.
  • आयत्या वेळी अंड्यातले पांढरे खूप फेसून त्यात घालावे व डोशाप्रमाणे लहान लहान डोसे करावेत.
  • प्रत्येक डोशावर वरील भाजी मध्यभागी १ डावभर घालून जरा पसरुन त्याची डोशाप्रमाणे घडी घालावी.
  • दोन्ही कडेची टोके पुन्हा दुमडुन चौकोनी घड्या घालून सर्व डोसे ठेवावेत. आणि सॉससोबत खाण्यास द्यावे.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


सर्व विभाग / जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची