कांचीपुरम इडली - पाककृती

कांचीपुरम इडली, पाककला - [Kanchipuram Idli, Recipe] पोटभर न्याहारी आणि ईडलीचा एक नवीन प्रकार म्हणून ‘कांचीपुरम ईडली’ खायला देता येईल.
कांचीपुरम इडली- पाककला | Kanchipuram Idli - Recipe

ईडलीचा एक नवीन प्रकार कांचीपुरम इडली

‘कांचीपुरम इडली’साठी लागणारा जिन्नस

 • २ वाट्या उकडा तांदूळ
 • १ वाटी उडीद डाळ
 • अर्धी वाटी चणा डाळ
 • पाव चमचा हिंग
 • १ चमचा काळी मिरी
 • १ टी. स्पून जीरे
 • थोडे आले किसून
 • थोडा कढीलिंब
 • थोडे काजूचे तुकडे
 • चवीनुसार मीठ

‘कांचीपुरम इडली’ची पाककृती

 • तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे.
 • जीरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला.
 • थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला.
 • आले किसून टाकून पीठ खूप फेटावे.
 • पीठ फेटून ईडली स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात.
 • चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.